Aarti Badade
माता सीतेला रावणाच्या तावडीतून वाचवण्यासाठी या पक्षीराजाने स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही. पण जटायू आणि श्रीराम यांच्यात नेमके काय नाते होते?
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
जटायू हे रामायणातील पराक्रमी गृध्रराज म्हणजेच गिधाडांचे राजा होते. ते अत्यंत विशाल आणि शक्तिशाली पक्षी होते. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा यासाठी त्यांची ओळख आहे.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
पौराणिक कथेनुसार, जटायू हे अरुण आणि श्येनी यांचे पुत्र होते. भगवान विष्णूंचे वाहन असलेले गरुड हे त्यांचे काका, तर संपाती हे त्यांचे मोठे भाऊ होते.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
जटायू आणि अयोध्येचे राजा दशरथ यांच्यात अतिशय जवळचे मैत्रीचे नाते होते. वनवासाच्या काळात पंचवटी येथे श्रीरामांची भेट झाल्यावर जटायूंनी स्वतःची ओळख दशरथांचा मित्र म्हणून करून दिली.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
राजा दशरथांचे जिवलग मित्र असल्यामुळे श्रीराम जटायूंचा वडिलांप्रमाणे आदर करत असत. पंचवटीत वास्तव्यास असताना जटायूंनी श्रीराम आणि माता सीतेच्या रक्षणाची जबाबदारीही स्वीकारली होती.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
रावण माता सीतेचे अपहरण करून लंकेच्या दिशेने जात असताना जटायूंनी त्याला अडवले. वृद्धावस्थेत असूनही त्यांनी रावणाशी शौर्याने युद्ध केले. या लढाईत त्यांनी रावणाच्या रथाचे नुकसान केले; मात्र रावणाने चंद्रहास तलवारीने त्यांचे पंख छाटले.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
सीतेचा शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण यांना जखमी अवस्थेतील जटायू दिसले. त्यांनी रावणाने सीतेचे अपहरण करून तिला दक्षिण दिशेला नेल्याची माहिती श्रीरामांना दिली.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
श्रीरामांच्या मांडीवर जटायूंनी अखेरचा श्वास घेतला. जटायूंनी केलेल्या त्यागामुळे श्रीराम भावुक झाले. त्यांनी पुत्राप्रमाणे जटायूंचे अंतिम संस्कार केले. त्यामुळे रामायणात जटायूंचे स्थान केवळ एका पक्ष्याचे नसून निष्ठा, मैत्री आणि त्यागाचे प्रतीक म्हणून आहे.
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal
Ancient Tax System naneghat
Sakal