Aarti Badade
सकाळी रिकाम्या पोटी चहा व बिस्किटे खाल्ल्याने पचन व ऍसिडिटीसारख्या समस्या होऊ शकतात.
बहुतेक बिस्किटांमध्ये फायबर, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते. रिफाइंड मैदा आणि साखर यामुळे त्या "रिकाम्या कॅलरीज" बनतात.
रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किटांचे सेवन केल्यास ऍसिड पातळी वाढते. यामुळे गॅस, उलट्या, किंवा जळजळ होऊ शकते.
बिस्किटांमधील साखर व चरबीमुळे शरीरात अधिक कॅलरी साठतात. सातत्याने सेवन केल्यास लठ्ठपणा वाढतो.
मैदा व ट्रान्स फॅट्समुळे अपचन, जडपणा, गॅसेस यांसारखे त्रास होऊ शकतात. पचनसंस्थेवर ताण येतो.
बिस्किटांमधील साखरेमुळे रक्तातील ग्लुकोज वाढतो.मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
भाजलेले शेंगदाणे, भाजलेल्या भाज्या, रताळे, संपूर्ण धान्याचे क्रॅकर्स, पोहे, किंवा भाजलेला चिवडा हे उत्तम पर्याय आहेत.