Neem Bath Benefits : आठवड्यातून 2-3 वेळा करा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ,हे आहेत जबरदस्त फायदे

सकाळ वृत्तसेवा

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर व मन दोन्ही ताजेतवाने होतात. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्मांमुळे अनेक त्वचासंबंधी त्रास दूर होतात.

neem benefits | Esakal

मुरुम व डागांवर उपाय

कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास मुरुम कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. डाग आणि डार्क स्पॉट्ससाठी ते उपयोगी आहे.

neem benefits in pimple | Esakal

केसांची चमक आणि कोंडा दूर

कोंड्याने त्रस्त आहात? कडुलिंबाचे पाणी केसांवर वापरल्यास कोंडा कमी होतो आणि निर्जीव केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.

neem benefits for hair problem | Esakal

डोळ्यांच्या संसर्गावर रामबाण

कडुलिंबाच्या पाण्याने डोळे धुतल्यास लालसरपणा, जळजळ आणि सूज यावर आराम मिळतो.

neem benefits eye problem | Esakal

घामोळे पासून मुक्ती

उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या पुरळ, घामोळ्यांवर कडुलिंबाचे पाणी प्रभावी आहे. अँटीबॅक्टेरियल घटक त्वचेला आराम देतात.

neem benefits body rashes | Esakal

घामाच्या दुर्गंधीवर नियंत्रण

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी दूर होते. शरीरातील बॅक्टेरियांची वाढ थांबते.

neem benefits sweat | Esakal

उवांवर उपाय

उवांची समस्या असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने केस धुवावेत. हे पाणी उवांच्या अंडी व पोळ्या नष्ट करण्यास मदत करते.

neem benefits hair problem | Esakal

तोंडी आरोग्यासाठी लाभदायक

कडुलिंबाच्या पाण्यामुळे हिरड्या मजबूत राहतात. अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया कमी करतात.

neem benefits gums | Esakal

नेहमीसाठी आरोग्याचा मंत्र

आठवड्यातून २-३ वेळा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा, केस, डोळे, तोंड – सर्वांनाच मिळते नैसर्गिक संरक्षण!

neem benefits for health | Esakal

पॅरालिसिसचा झटका येण्याआधी आठवडाभर दिसतात 'ही' 3 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष..

Paralysis attack stroke warning signs | esakal
येथे क्लिक करा.