Pranali Kodre
नीरज चोप्रा भारतीलच नाही, जर जगातीलही अव्वल क्रमांकाचा भालाफेकपटू आहे.
नीरज चोप्राने दोन ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासोबतच जवळपास सर्व महत्त्वाच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत.
नुकतेच नीरजने स्टार स्पोर्ट्सवरील नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सूत्रसंचालनाखालील विशेष कार्यक्रमात कोणता क्रिकेटपटू उत्तम भालाफेकपटू बनू शकला असता यावर भाष्य केले आहे.
नीरजच्या मते चांगला भालाफेकपटू एक वेगवान गोलंदाज बनू शकतो. कारण त्यांची शारीरिक बांधणी भालाफेकीसाठी योग्य ठरू शकते.
त्यामुळे नीरजने जसप्रीत बुमराहचे नाव घेतले.
तसेच नीरजने म्हटले की बुमराह पूर्णपणे फिट असताना तो भालाफेकीत चांगले प्रदर्शन करू शकतो.
बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.