Photo: जेव्हा रोहितची टीम इंडिया झालेली T20 वर्ल्ड चॅम्पियन; त्या क्षणांच्या खास आठवणी

Pranali Kodre

२९ जून २०२४

२९ जून २०२४... भारतीय क्रिकेटच्या इतिहास कायमस्वरुपी ही तारीख कोरली गेली.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

वर्षपूर्ती

याच दिवशी एक वर्षांपूर्वी म्हणजे २९ जून २०२४ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

फायनल

बार्बाडोसच्या मैदानात झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ७ धावांनी पराभूत केलं.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप

या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी २००७ मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

रोहित शर्मा

रोहित दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एकमेव खेळाडूही ठरला. २००७ च्या टी२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही तो भाग होता.

Rohit Sharma | T20 World Cup | X/BCCI

विजयाची चव

हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजयाची चव चाखायची म्हणून रोहितने मैदानावरील माती तोंडातही टाकली. इतकंच नाही, तर भारताचा तिरंगाही त्याने मैदानात अभिमानाने रोवला.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

ट्रॉफी

वर्ल्ड कप स्वीकारताना पोडियमवर भारतीय खेळाडू उभे असताना कर्णधार रोहित रोबो सारखी अॅक्शन करत ट्रॉफी घेण्यासाठी आला आणि ट्रॉफी स्वीकारल्यानंतर सर्वांनी मिळून ती उंचावली.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

दिग्गजांची निवृत्ती

या सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

बक्षीस

या विजेतेपदाबद्दल बीसीसीआयने भारतीय संघासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली होती.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

विजयी मिरवणूक

तसेच भारतीय संघ मुंबईत परतल्यानंतर त्यांची ओपन बसमधून विजयाची मिरवणूक काढण्यात आलेली, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सर्वांचा सत्कारही करण्यात आलेला.

Team India T20 World Cup 2024 Win | Sakal

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारे ६ भारतीय खेळाडू

Smriti Mandhana | Sakal
येथे क्लिक करा