सकाळ डिजिटल टीम
दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचा थकवा आणि तणाव वाढतो.
सतत खुर्चीवर बसल्यामुळे पाठीवर अनावश्यक दबाव येतो, ज्यामुळे पोस्टर खराब होऊ शकतो.
मणक्यांवर ताण येऊन दीर्घकाळ त्रास होण्याची शक्यता असते.
हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढू शकते आणि चयापचय मंदावू शकतो.
स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांचा थकवा आणि डोकेदुखी वाढू शकते.
सतत एका जागी बसल्यामुळे शरीर जड आणि थकल्यासारखे वाटू लागते.
डेस्क जॉब करणाऱ्यानी काही सोपी प्रभावी योगासनं व्यायाम केले पाहिजेत.