भेंडी खाताना 'या' 5 चुका टाळा; नाहीतर फायद्याऐवजी होईल शरीराचे नुकसान!

Aarti Badade

पोषक तत्वांचा खजिना

भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, K आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

मधुमेह आणि पचनासाठी उत्तम

भेंडीतील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

दूध आणि भेंडी टाळा

भेंडीतील ऑक्सालेट आणि दुधातील कॅल्शियम मिळून 'कॅल्शियम ऑक्सालेट' तयार होऊ शकते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका संभवतो.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

चहासोबतचे नुकसान

भेंडी खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास त्यातील टॅनिन्स पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतात आणि शरीरातील वात-कफ दोष बिघडवू शकतात.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

रेड मीटशी विसंगती

रेड मीट पचायला जड असते आणि भेंडीचा चिकटपणा पचन प्रक्रिया अधिक संथ करतो, ज्यामुळे पोटात गॅस आणि जडपणा जाणवू शकतो.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

मुळा आणि भेंडी

भेंडीसोबत मुळा खाल्ल्यास अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, कारण मुळ्यामुळे गॅस होण्याची शक्यता जास्त असते.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

कारले आणि भेंडी

दोन्ही भाज्या थंड प्रवृत्तीच्या असल्याने त्यांचे एकत्रित सेवन केल्यास शरीरातील कफ वाढू शकतो, ज्यामुळे सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

स्वयंपाकाची योग्य पद्धत

भेंडी धुवून कोरडी करूनच शिजवावी. शिजवताना लिंबू किंवा आमसूल वापरल्यास तिचा बुळबुळीतपणा कमी होऊन शरीरात लोहाचे शोषण चांगले होते.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

वरील माहिती आयुर्वेदिक मान्यतेवर आधारित आहे. आहारात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Lady Finger okra Food Combinations

|

Sakal

झोपेत छातीत ‘ही’ 3 लक्षणे दिसतायत? हार्टसाठी धोक्याचा इशारा असू शकतो!

Chest pain reasons at night

|

Sakal

येथे क्लिक करा