Saisimran Ghashi
विष्णू पुराणात अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी कधीही विकू नयेत.
धार्मिक दृष्टिकोनातून या गोष्टींचे महत्त्व खूप महत्वाचे आहे. त्यांची विक्री केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वासरू जन्माला आल्यावर गाईचे दूध फक्त वासरासाठी असते. ते विकणे म्हणजे धर्मद्रोह मानला जातो. त्याने पुण्य कमी होते व पाप वाढते.
मोहरीचे तेल विकल्यास घरात कलह, अशांती व आर्थिक अडचणी वाढतात असे विष्णू पुराण सांगते.
पूजेसाठी वापरण्यात येणारे तांदूळ विकणे म्हणजे धर्माची हानी होणे. हे केवळ दान किंवा उपासनेसाठीच वापरावे.
पूजेमध्ये वापरली जाणारी तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते. ती विकणे म्हणजे पुण्य नष्ट करणे.
गूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. गरजूला दान करणे योग्य, पण नफा कमावण्यासाठी विकणे अशुभ मानले जाते.
ही केवळ सामान्य माहिती आहे, सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धाला प्रोत्साहन देत नाही