इराणचा नवा सर्वोच्च नेता किती श्रीमंत? अनेक देशात खामेनेईंच्या मुलाचं साम्राज्य

सूरज यादव

खामेनेईंचा मृत्यू

अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीय.

mojtaba khamenei

|

Esakal

मोजतबा खामेनेई

मोजतबा हे खामेनेईंचे द्वितीय सुपुत्र आहेत. ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता असून अनेक देशांमध्ये त्यांचे साम्राज्य पसरले आहे.

mojtaba khamenei

|

Esakal

अमेरिकेची बंदी

मोजतबा यांच्यावर २०१९मध्ये अमेरिकेनं बंदी घातली होती. आता त्यांच्याच हातात इराणची सत्ता आलीय. याआधी त्यांच्याकडे कोणतंही पद किंवा सरकारमध्ये अधिकृत भूमिका नव्हती.

mojtaba khamenei

|

Esakal

अब्जावधींची गुंतवणूक

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मोजतबा यांच्याकडे अनेक देशांमध्ये मालमत्ता आहेत. पाश्चिमात्य बाजारात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे.

mojtaba khamenei

|

Esakal

स्वीस बँकेत पैसा

मोजतबा यांचे पैसे स्वीस बँकेच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. याशिवाय १३८ मिलियन पाउंडपेक्षा जास्त किंमतीची एक ब्रिटिश लग्जऱी प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्याकडे आहे.

mojtaba khamenei

|

Esakal

२००४मध्ये लग्न

मोजतबा यांचं लग्न जहरा हदद-अब्देल हिच्याशी झालं होतं. ती इराणमधील नेते गुलाम अली हदेद अब्देल यांची मुलगी आहे. दोघांचं लग्न २००४ मध्ये झालं होतं.

mojtaba khamenei

|

Esakal

पत्नीचा मृत्यू

मोजतबा आणि जहरा यांना तीन अपत्ये असल्याचं म्हटलं जातंय. तर जहरा यांचा अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

mojtaba khamenei

|

Esakal

इराणचा सर्वोच्च नेता कसा निवडला जातो, धार्मिक पॉलिटिकल सिद्धांत काय?

mojtaba khamenei

|

Esakal

इथं क्लिक करा