सूरज यादव
केंद्र सरकारने नव्या कामगार कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये मोठा बदल होणार आहे. पण यामुळे हातात येणारा पगार कमी होऊ शकतो.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
नव्या कर्मचारी कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन त्यांच्या एकूण कॉस्ट टू कंपनीच्या किमान ५० टक्के किंवा सरकार जितके टक्के सांगेल तेवढे हवे.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
पीएफ आणि ग्रॅच्युटी ही मूळ वेतनाच्या आधारे होते. मूळ वेतन वाढल्यानं पीएफ आणि ग्रॅच्युटीसुद्धा वाढेल. यामुळे कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट सेव्हिंग्ज वाढेल.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
मूळ वेतानाच्या आधारे पीएफ, ग्रॅच्युटी झाल्यानं हातात येणारं वेतन कमी होईल. एकाच सीटीसीमध्ये पीएफ आणि ग्रॅच्युटीसाठीचं योगदान जाईल. यामुळे हातात येणाऱ्या वेतनात मोठा फरक पडेल.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
पीएफचं योगदान हे मूळ वेतनाच्या १२ टक्के तर ग्रॅच्युटी ही शेवटचं मूळ वेतन आणि कंपनीत पूर्ण केलेली वर्षे या आधारांवर होतं.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
बेसिक वेतनात वाढीसह पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये दिलं जाणारं योगदान वाढेल. या बदलामुळे ज्या कंपन्या रिटायरमेंट फंडात योगदान कमी करण्यासाठी बेसिक सॅलरी कमी ठेवतात त्यांच्यावर निर्बंध येतील.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
Esakal
कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतरची सुरक्षा चांगली मिळेल पण खर्चाचं संतुलन करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हाती येणारं वेतन कमी होऊ शकतं. कामगार कायदा लागू होण्यामुळे पीएफ, ग्रॅच्युटी वाढणार हे निश्चित झालंय.
New Labour Law: Take Home Salary to Reduce as PF and Gratuity Increase In Hand
mobile
ESakal