Monika Shinde
जुनी साडी नेसायची नाही, पण ती अजूनही मनाला प्रिय आहे? तर आता त्या साड्यांपासून तुम्ही बनवू शकता स्टायलिश आणि ट्रेंडी ड्रेस.
आजकाल ‘साडी रीफॅशन’चा ट्रेंड जोरात आहे. पण नेमकं काय बनवायचं, हेच कळत नाही? मग हे खास पाच आयडिया तुमच्यासाठीच!
जर तुमच्याकडे अशी एखादी साडी असेल ज्यावर सुंदर काठ किंवा जरीचं काम असेल, आणि ती नेसली जात नसेल, तर तिचा दुपट्टा बनवा! प्लेन ड्रेसवर असा हेवी व आकर्षक दुपट्टा दिला, की लुक लगेच उठून दिसतो.
पैठणी, कांजिवरम, इरकल किंवा सॉफ्ट सिल्क साड्यांपासून तुम्ही शानदार लेहंगा आणि क्रॉप टॉप तयार करू शकता. पारंपरिक लूक राखूनही यामध्ये मॉडर्न टच देता येतो. खास सण-समारंभासाठी हा पर्याय उत्तम!
साडीपासून शिवलेले गाऊन हे स्टायलिश आणि एलिगंट दिसतात. पैठणीसारख्या साड्यांचा पदर गाऊनच्या बॉर्डरला वापरून तुम्ही खास डिझायनर लूक तयार करू शकता. यात पारंपरिकतेचा थोडा ग्लॅमरस टच मिळतो.
जर तुम्हाला थोडा हटके आणि फंकी लूक हवा असेल, तर जुन्या कॉटन सिल्क किंवा मोठ्या बॉर्डर असलेल्या साड्यांपासून शॉर्ट ड्रेस शिवता येतो. यात मागचा डीप नेक, फ्रंट राउंड नेक आणि स्लीव्ह्जसह पोठली वर्क वापरून स्टायलिश डिझाईन देता येते.
आजकाल पलाझो पँट्स फॅशनमध्ये आहेत. तुमच्या जुन्या, मऊसर साड्यांपासून आरामदायक आणि ट्रेंडी पलाझो शिवता येतील. हे तुम्ही कुर्तीसोबत, शॉर्ट टॉपसह किंवा क्रॉप टॉपवरही मॅच करू शकता.शॉर्ट ड्रेससाठी परफेक्ट उपाय