डायबिटीज रुग्णांनी लक्ष द्या! रात्रीच्या छोट्या चुका सकाळी वाढवतात शुगर

Aarti Badade

रिकाम्या पोटी साखर वाढणे

अनेकांना रात्री काहीही न खाल्ल्यावरही सकाळी रक्तातील साखर वाढलेली आढळते, यालाच 'फास्टिंग ब्लड शुगर' वाढणे असे म्हणतात.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

इन्सुलिन प्रतिकार

जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा साखर पेशींत जाण्याऐवजी रक्तातच राहिल्याने शुगर लेव्हल वाढते.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

अपुरी झोप आणि संप्रेरके

रात्री वारंवार जाग येणे किंवा अपुरी झोप झाल्यामुळे शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडून साखरेची पातळी वाढू शकते.

Diabetes night routine Blood Sugar

|

sakal

शरीराची नैसर्गिक जैविक प्रक्रिया

पहाटेच्या सुमारास शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही संप्रेरके स्रवते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या साखरेची पातळी थोडी वाढू शकते.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

रात्रीचे जड जेवण आणि स्नॅक्स

रात्रीच्या जेवणात जास्त कर्बोदके (Carbs) असणे किंवा उशिरा स्नॅक्स खाणे हे सकाळी साखर वाढण्यामागील एक मुख्य कारण ठरू शकते.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित ठेवा

सकाळी शुगर नॉर्मल येण्यासाठी रात्रीच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

जेवणानंतर १५ मिनिटे चाला

रात्रीचे जेवण वेळेवर करून त्यानंतर १० ते १५ मिनिटे हलके चालल्याने पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

तणावमुक्त राहून पुरेशी झोप घ्या

झोपण्यापूर्वी ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि शांत झोप लागल्यामुळे सकाळी शुगर रीडिंग नॉर्मल येण्यास मदत होते.

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

हार्ट अटॅक अचानक येत नाही; 2 दिवस शरीर देतं ‘हे’ संकेत!

Heart attack symptoms before 48 hours

|

Sakal

येथे क्लिक करा