Aarti Badade
रात्रपाळीत नियमितपणे काम करण्याचा परिणाम केवळ झोपेवरच नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
‘युरोपियन हार्ट जर्नल’मधील अभ्यासात यूके बायोबँकशी संबंधित ४२,६७१ लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी १,३२२ जण नियमित नाइट शिफ्टमध्ये काम करत होते.
Heart Attack
संशोधकांनी एमआरआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हृदयाचा अभ्यास केला. नियमित रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये हृदयाच्या मुख्य पंपिंग कक्षाच्या भिंती किंचित जाड आणि काही कक्ष आकाराने लहान असल्याचे आढळले.
अभ्यासात हृदयाच्या पंपिंग क्षमतेचे महत्त्वाचे माप असलेल्या इजेक्शन फ्रॅक्शनमध्ये लक्षणीय फरक आढळला नाही. त्यामुळे रात्रपाळी करणाऱ्या प्रत्येकाचे हृदय कमकुवत होते, असा निष्कर्ष काढता येत नाही.
नियमित रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये ओमेगा-३ मधील डीएचए या घटकाची पातळी कमी असल्याचे दिसले. तसेच ट्रायग्लिसराइड्स आणि दाहाशी संबंधित काही निर्देशकांमध्येही फरक आढळला.
Heart Attack
आपल्या शरीराचे सर्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ झोप, जागरण आणि शरीरातील विविध क्रिया नियंत्रित करते. सतत रात्री जागे राहिल्याने या नैसर्गिक चक्राचा ताळमेळ बिघडू शकतो.
Heart Attack
कामानंतर पुरेशी झोप घ्या, आहारात फळे-भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, नियमित व्यायाम करा आणि रक्तदाब, साखर व कोलेस्टेरॉल तपासत राहा.
Heart Attack
sakal
stroke
Sakal