Aarti Badade
स्ट्रोक आल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ ही पद्धत उपयुक्त ठरते.
stroke
Sakal
चालताना अचानक तोल जाणे, चक्कर येणे किंवा शरीराचा समतोल राखता न येणे ही स्ट्रोकची संभाव्य लक्षणे असू शकतात.
Warning signs of brain stroke
Sakal
अचानक धूसर दिसणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांनी कमी दिसणे अथवा एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे, याकडे दुर्लक्ष करू नका.
stroke
Sakal
हसताना चेहऱ्याची एक बाजू खाली झुकत असेल किंवा चेहऱ्यावर अचानक असमानता दिसत असेल, तर ते स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
stroke
Sakal
एका हातात किंवा शरीराच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा, बधिरपणा जाणवणे किंवा हात वर उचलता न येणे, हे धोक्याचे संकेत आहेत.
stroke
Sakal
बोलताना शब्द अस्पष्ट होणे, योग्य शब्द न सुचणे, बोलता न येणे किंवा दुसऱ्याचे बोलणे समजण्यात अडचण येणे ही स्ट्रोकची लक्षणे असू शकतात.
stroke
Sakal
यापैकी एकही लक्षण दिसल्यास त्वरित ११२ किंवा १०८ वर संपर्क साधा. लक्षणे सुरू झाल्याची वेळ नोंदवा, रुग्णाला खाणे-पिणे देऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅस्पिरिन देऊ नका.
stroke
Sakal
Old Name of Mumbai
Sakal