जवसाच्या बिया खाल्ल्याने काय होते?

Aarti Badade

रोजच्या आहारात जवसाचा समावेश करता का?

जवसाच्या बियांमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

Flaxseeds

|

Sakal

पचनक्रिया सुधारण्यास मदत!

जवसातील भरपूर फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

Flaxseeds

|

Sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर!

जवसामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि फायबर खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

Flaxseeds

|

Sakal

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत!

जवसाच्या नियमित सेवनामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्यासाठी औषधोपचार आणि संतुलित जीवनशैलीही महत्त्वाची आहे.

Flaxseeds

|

Sakal

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत!

जवसमधील फायबरमुळे अन्नातील साखर शरीरात शोषली जाण्याचा वेग कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास हातभार लागू शकतो.

Flaxseeds Benefits

| esakal

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त!

जवसातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे राहते. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Flaxseeds | Sakal

जवस किती आणि कसे खावे?

दररोज साधारण १ ते २ चमचे जवस हलके भाजून त्याची पूड करून खाऊ शकता. ही पूड दही, भाकरी, पोळी किंवा सॅलडमध्ये मिसळता येते. सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करा आणि पुरेसे पाणी प्या.

Flaxseeds benefits | Sakal

रात्रपाळीत काम करता? हृदयाच्या रचनेत होऊ शकतात हे बदल!

Heart Attack

|

esakal

येथे क्लिक करा