सकाळ डिजिटल टीम
रात्रीच्या जेवणात भारी, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ टाळा. त्याऐवजी हलका, पचनास मदत करणारा आहार निवडा.
कोमट पाण्याबरोबर एक चमचा तूप घेतल्यास वात व पित्त संतुलित राहतात, आणि पचन सुधारते.
रात्री जागरणामुळे चहा-कॉफीचे सेवन वाढते, ते कमी करणे आवश्यक आहे. त्याऐवजी शहाळ्याचे पाणी घ्या.
कामानंतर शक्य तितक्या शांत व गडद वातावरणात नियमित झोप घ्या.
डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवा, सुनयन तेल किंवा आयुर्वेदिक काजळ वापरा. कोरफडीचा गर लावणेही उपयुक्त.
रोज सकाळी १० मिनिटे प्राणायाम करा. कामाच्या वेळात थोडे चालणे (५०-१०० पावले) आवश्यक आहे.
आठवड्यातून १-२ वेळा संपूर्ण अंगाला तेल लावून अभ्यंग करा व शक्य असल्यास स्वेदन (औषधी वाफ) घ्या.
झोपण्याआधी पायांना तिळाचे किंवा सिद्ध तेल लावल्यास झोप सुधारते व डोळ्यांचे आरोग्य टिकते.