Aarti Badade
शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून, सतत शिकण्याची वृत्ती असते. हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
ब्रिटिश-ग्रीक संशोधक, प्राध्यापक आणि सार्वजनिक आरोग्य, गुन्हे न्याय व जागतिक सुरक्षा यामध्ये तज्ञ.
३ डॉक्टरेट पदव्या,४ अन्य पीएचडीसाठी उमेदवारी,५ पदव्युत्तर प्रमाणपत्रं (हार्वर्ड, सोरबोनसारख्या विद्यापीठांतून) मिळाले आहेत.
निकोलास झेनीयॉस हे जगभरातील ७ विज्ञान अकादमींचे ‘अकॅडेमिशियन’ आहेत. त्यात दोन रॉयल संस्था देखील आहेत!
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय संशोधन, आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान. त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे आहे.
बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन,क्रिमिनल जस्टिस,इंटेलिजन्स आणि ग्लोबल सिक्युरिटी,मानसशास्त्र,सार्वजनिक आरोग्य प्राविण्य मिळवले.
हार्वर्ड मेडिकल स्कूल, सोरबोन यांसारख्या संस्थांतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे झेनीयॉस यांना वैविध्यपूर्ण समस्या सोडवण्याची क्षमता मिळाली.
निकोलास झेनीयॉस हे दाखवतात की वय, पदवी किंवा व्यवसाय म्हणजे मर्यादा नसतात. सतत शिकत राहणं हाच यशाचा खरा मंत्र!