Anushka Tapshalkar
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेट सादरीकरणाच्या वेळी विविध रंगांच्या साड्या नेसून एक विशेष संदेश दिला आहे. प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ असतो, जो त्यांच्या बजेट भाषणाशी संबंधित असतो.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2019मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाची, सोनरी काठ असलेली मंगलगिरी साडी नेसली होती. यावेळी ब्रीफकेसऐवजी भारतीय परंपरेचा ‘बही-खाता’ वापरण्यात आला.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2020मध्ये बजेट सादर करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी निळ्या काठाची पिवळसर-सोनेरी रेशमी साडी नेसली होती. हा रंग नव्या सुरुवातीचा आणि आशेचा मानला जातो.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2021साली निर्मला सीतारामन यांनी लाल आणि पांढरी मिक्स साडी नेसली होती. या साडीत तेलंगणाच्या पारंपरिक जियोमेट्रिक नमुने आणि चमकदार काठ आधुनिक टच देत होता.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पासाठी तपकिरी रंगाची बोमकाई साडी परिधान केली होती. ओडिशाच्या प्रसिद्ध हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या या साडीवर जरिचे काम केलेले होते.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2023 मध्ये निर्मला सीतारामन यांनी लाल रेशमी साडी नेसली होती, ज्यावर काळा-सोनेरी मंदिर काठ आणि कर्नाटकच्या पारंपरिक कासुती भरतकाम होते.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2024 च्या सुरुवातीस अंतरिम बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी निळ्या टसर रेशमी साडी परिधान केली होती, ज्यावर पश्चिम बंगालच्या पारंपरिक कांथा भरतकामाचे नाजूक काम दिसत होते.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2024च्या बजेटसाठी निर्मला सीतारामन यांनी लीफ प्रिंट बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट चेक्स्ड साडी नेसली होती. क्रीम आणि ऑफ-व्हाइट रंग समृद्धी आणि कोमलतेचे प्रतीक आहे, तर मॅजेंटा रंग सार्वत्रिक सौहार्द आणि भावनिक संतुलन दर्शवतो.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
2025-26 च्या बजेटवेळी निर्मला सीतारामन यांनी मासे नक्षी असलेली पांढरट मधुबनी साडी परिधान केली, जी प्रसिद्ध कलाकार दुलारी देवी यांची भेट होती.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
यंदाचं 2026चं बजेटा सादर करताना निर्मला सीतारामन यांनी तमिळनाडूच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेला अभिवादन करत हाताने विणलेली जांभळ्या रंगाची ‘कट्टम कांजीवरम’ साडी नेसली आहे.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
निर्मला सीतारामन यांच्या साड्यांचे रंग हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून त्यांच्या आर्थिक धोरणांशी आणि सामाजिक संदेशांशी जुळणारे आहेत.
Nirmala Sitharaman Budget Sarees
sakal
Difference Between Union and State Budget
sakal