सकाळ डिजिटल टीम
वडापाव कुणाला आवडत नाही? संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी वडापाव हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही वडापाव खूप आवडतो. पुण्यातील प्रभात रेस्टॉरंटचे वडापाव गडकरींना विशेष आवडतात.
गडकरींनी एका मुलाखतीत वडापावाची रेसिपी सांगितली. त्यात बटाटा उकडून, त्याला कुस्करून लिंबू, काळं मीठ, आलं-लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि मिर्ची घालून मिक्स करावा.
सर्व घटक मिक्स करून त्यात थोडी साखर टाका. वड्याचे मिश्रण तयार झाले की, ते बेसन पिठात बुडवून तळा.
गडकरी सांगतात की, या वडापावमध्ये लाल मिर्ची पावडर आणि हळद नसेल, तरीही ते अप्रतिम लागते.
नितीन गडकरी हे खवय्ये आहेत. भारतीय पदार्थांसोबतच गडकरींना चायनीज पदार्थ खायला देखील आवडतात.
गडकरींच्या वडापाव रेसिपीचा स्वाद एकदा घेतल्यावर, तुम्ही देखील या पद्धतीचा वडापाव पुन्हा-पुन्हा बनवाल!