Pranali Kodre
भारताच्या १८ वर्षीय डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकून इतिहास घडवला.
त्याच्या या यशात मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांचाही मोलाचा वाटा राहिला. स्पर्धेच्या ६ महिन्यांपासून ते त्याचे मानसिक आरोग्य सांभाळत आहेत.
पॅडी अप्टन यांच्या म्हणण्यांनुसार डी गुकेशकडून अशा ६ गोष्टी आपण शिकू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला खेळ, व्यायसाय आणि आयुष्यात होऊ शकतो.
गुकेश त्याच्या प्रकिस्पर्ध्याचा संपूर्ण आभ्यास करतो, त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत आहे, हे जाणून तयारी करा. पूर्णपणे तयारी करून आव्हानाला सामोरे जा. वरवर तयारी करण्यापेक्षा सखोल विचार करून तयारी करा.
अपयश हा एक खेळाचा भाग आहे, हे समजून घ्या. त्यामुळे त्याला अपयश आले, तर ते शांततेच स्वीकारा. त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि आहे ते काम पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
जेव्हा यश जवळ असते तेव्हा अतिउत्साही होऊ नका आणि भीतीही वाटू देऊ नका, ज्यामुळे गडबड होईल. संयमाने तुमच्या यशाकडे पाऊल उचला, तुमचे काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा.
तुम्हाला अपयश येणारच आहे, पण त्याला घाबरण्यात अर्थ नाही. त्यामुळे यश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना निर्णय घ्यायला घाबरू नका. अपयश टाळण्यापेक्षा यशाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा.
यश मिळालं तरी आणि अपयश मिळालं तरी नम्र राहा.
तुमचं यश तुमच्या हातात आहे. परिस्थिती विरुद्ध असली तरी प्रयत्न करत राहा, कधीही हार मानू नका. जरी दुसऱ्यांनी हार मानली, तरी तुम्ही खचून जाऊ नका आणि शेवटपर्यंत प्रयत्न करा.