Aarti Badade
निवटी हा मासा चवीला अत्यंत उत्कृष्ट असतो. आज आपण पाहणार आहोत भारती किणी यांची खास 'निवटी कालवण' रेसिपी!
Niwati Kalvan fish curry
Sakal
१०-१५ निवटी मासे,१ मोठा कांदा, २ हिरव्या मिरच्या,४ पाकळ्या लसूण, चिंचेचा कोळ,मसाला, हळद, मीठ आणि तेल,१ चमचा तांदळाचे पीठ
Niwati Kalvan fish curry
Sakal
प्रथम निवटी व्यवस्थित कापून आणि साफ करून घ्या. त्यानंतर २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या जेणेकरून मासे नीट स्वच्छ होतील.
Niwati Kalvan fish curry
Sakal
गॅसवर पातेल्यात २ पळी तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण आणि मिरचीचे तुकडे टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.
Niwati Kalvan fish curry
Sakal
कांदा व्यवस्थित परतला की त्यात १ चमचा हळद, २ चमचे मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
Niwati Kalvan fish curry
Sakal
तयार मसाल्यात स्वच्छ केलेली निवटी टाकून हलक्या हाताने परतून घ्या, जेणेकरून मसाला माशांना नीट लागेल.
Niwati Kalvan fish curry
sakal
थोडा चिंचेचा कोळ घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ मिक्स करून कालवणात टाका. यामुळे कालवणाला छान दाटपणा आणि आंबट-तिखट चव येते.
Niwati Kalvan fish curry
Sakal
कालवणाला ५ ते ६ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. तयार आहे तुमचं झणझणीत निवटीचं कालवण! भाकरी किंवा भातासोबत याचा आस्वाद घ्या.
Niwati Kalvan fish curry
Sakal
Prawns kolambi Bhaji recipe
Sakal