Sandip Kapde
शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता वाटते.
त्याकाळी लोकांचे जीवनमान कसे होते? शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा आहार कसा होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण शोधत असतो.
चला, आता विचार करूया – शिवाजी महाराजांच्या काळात मिरची अस्तित्वात होती का?
वरिष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी यासंदर्भात माहिती 'भवताल' या यूट्यूब चॅनलवर दिली आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात खाण्यात मिरचीचा वापर केला जात नव्हता, कारण मिरचीचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला होता.
मिरची प्राचीन काळापासून मेक्सिकोच्या प्रदेशात लागवड केली जात होती.
पोर्तुगीज १५वे आणि १६वे शतकात दक्षिण अमेरिकेत पोहोचले.
त्यांनी तिथून अनेक वस्तू इतर भागात पाठविल्या.
त्यापैकी एक म्हणजे मिरची.
मिरची भारतात आली, तो काळ म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ; मात्र त्यावेळी तिचा वापर फारसा झाला नव्हता.
मिरचीच्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात मसाल्यात काळी मिरी वापरली जात होती.
तसेच आलं आणि लसूण यांनाही तिखटपणा होता.