'या' शहरात माणसांना मरायला आहे बंदी, अजब नियमामागे दडलंय वैज्ञानिक कारण

Yashwant Kshirsagar

आश्चर्य

जगात असे ठिकाण आहे तिथे माणसांना मरण्यास मनाई आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल असेल,

No Death Town

|

esakal

अनोखा नियम

पण हे खरं आहे नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन बेटांवर असलेल्या लॉन्गइअरब्येन शहरात असा अनोखा नियम आहे. तो माणसांप्रमाणे प्राण्यांनाही लागू आहे.

No Death Town

|

esakal

वैज्ञानिक कारण

या नियमामागे अंधश्रद्धा नाही तर वैज्ञानिक आणि पर्यावरणीय कारण आहे. हा नियम जवळजवळ ७० वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जाते.

No Death Town

|

esakal

जगभरात चर्चा

या अनोख्या कायद्यामुळे सुमारे २,४०० लोकसंख्या असलेले हे छोटे शहर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.

No Death Town

|

esakal

तीव्र थंडी

उत्तर ध्रुवापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या शहरात वर्षभर तीव्र थंडी असते. तापमान अनेकदा -२० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ही तीव्र थंडी या विचित्र नियमामागील खरे कारण आहे.

No Death Town

|

esakal

मुख्य भूमी

जर कोणी गंभीर आजारी पडला किंवा मृत्यू जवळ आला तर त्याला ताबडतोब मुख्य भूमी नॉर्वेला तेथे मरण्यासाठी पाठवले जाते.

No Death Town

|

esakal

पर्माफ्रॉस्ट समस्या

हा परिसर पर्माफ्रॉस्ट झोनमध्ये येतो. पर्माफ्रॉस्ट म्हणजे अशी माती जी वर्षभर गोठलेली असते आणि कधीही वितळत नाही.

No Death Town

|

esakal

मृतदेहांचे कुजणे

या अति थंडीमुळे मातीत गाडलेले मृतदेह कुजत नाहीत. तापमान इतके कमी राहते की जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव त्यांचे मृददेहाचे विघटनाचे कार्य सुरू करू शकत नाहीत.

No Death Town

|

esakal

रोगांचा धोका

शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की जर मृतदेह विघटित झाले नाहीत, तर अनेक दशकांपुर्वीचे किंवा शतकांपूर्वीचे विषाणू आणि जीवाणू जिवंत राहू शकतात.

No Death Town

|

esakal

भविष्यातील संकट

जर भविष्यात हे मृतदेह वितळले तर हे जुने रोग पसरवणारे विषाणू बाहेर पडू शकतात ज्यामुळे एक मोठे आरोग्य संकट निर्माण होऊ शकते,याची देखील भीती आहे.

No Death Town

|

esakal

दिल्लीतील भीषण स्फोटात १३ ठार, काळजाचा थरकाप उडवणारे फोटो समोर

Delhi Red Fort blast

|

esakal

येथे क्लिक करा