Aarti Badade
मेकअपशिवाय चेहरा तेजस्वी दिसावा वाटतं? मग या टिप्स आजपासूनच सुरू करा!
दैनंदिन चेहरा स्वच्छता सकाळी सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा आणि कोरफडीचा जेल लावा – त्वचेला थंडावा आणि चमक मिळेल.
दही + तांदळाचं पीठ आठवड्यातून २ वेळा नैसर्गिक स्क्रब वापरा. मृत त्वचा काढून टाका आणि ताजेपणा आणा.
टोमॅटो रस + बर्फाचा उपयोग टोमॅटो रस आणि बर्फाचे तुकडे घेऊन मसाज करा. त्वचा घट्ट आणि चमकदार बनेल.
गुलाबपाणी + ग्लिसरीन + व्हिटॅमिन ई रात्री झोपण्यापूर्वी हा मिश्रण चेहऱ्यावर लावा – सकाळी चेहरा नितळ आणि फ्रेश!
मुलतानी माती + गुलाबजल मास्क आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा – तेलकटपणा कमी होईल आणि त्वचेला उजळपणा मिळेल.
पाणी आणि फळांचा आहार दररोज ८-१० ग्लास पाणी प्या. हायड्रेटेड राहिलात तर त्वचा नैसर्गिकरित्या झळकते.
सौंदर्यासाठी झोप आणि पोषण आवश्यक स्वच्छ त्वचेसाठी भरपूर झोप आणि पोषणमूल्यांनी युक्त आहार घ्या.