व्यायाम करायची इच्छा होत नाही? 'या' सिंपल आणि स्मार्ट टिप्स करतील मदत

Anushka Tapshalkar

व्यायाम

व्यायामाला वेळ नाही? इच्छा नाही? तरीही फिट राहायचंय? मग पुढे दिलेल्या स्मार्ट ट्रिक्स तुमच्यासाठीच आहेत!

Exercise

| Sakal

१ तास नको, १५ मिनिटे पुरे

दररोज तासभर व्यायाम जमेलच असे नाही. पण १५–२० मिनिटे चालणे, डान्स किंवा हलकी हालचालही पुरेशी ठरते.

Exercise

| Sakal

‘परफेक्ट’च्या नादात काहीच नाही

परफेक्ट वर्कआउटच्या विचारात आपण अनेकदा काहीच करत नाही. पण जेवढा वेळ मिळेल, तेवढी हालचाल महत्त्वाची आहे.

Exercise

| Sakal

व्यायाम म्हणजे वजन कमी नाही

वजन काट्यावर कमी दिसत नसले तरी व्यायामाचे फायदे मिळतातच. तो मन आणि शरीर दोन्हींसाठी आवश्यक आहे.

Weight Loss

|

Sakal

व्यायामाचे इतर फायदे ओळखा

व्यायामामुळे तणाव कमी होतो, ऊर्जा वाढते, मन शांत राहते आणि दिवसभर फ्रेश वाटते.

Exercises Benefits

|

sakal

तुम्हाला आवडेल तोच व्यायाम निवडा

जिमला जाण्याची इच्छा नसेल तरी हरकत नाही. डान्स, पोहणे, सायकलिंग, खेळ, निसर्गात फिरणे, तुम्हाला जे आवडतं तेच करा.

Cycling | sakal

व्यायामामागचं ‘कारण’ स्पष्ट ठेवा

मुलांसोबत खेळताना दम न लागावा, थकवा कमी व्हावा, पुढील १० वर्षं तंदुरुस्त राहावं; कारण स्पष्ट असेल तर इच्छाशक्ती आपोआप निर्माण होते.

Clear the purpose of doing exercise

|

sakal

वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्किप करणं खरंच फायदेशीर ठरतं?

Weight Loss Tips | Sakal
आणखी वाचा