Anushka Tapshalkar
संत्र्याच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
Orange Peel Powder Face Serum
sakal
२ ते ३ संत्र्यांच्या साली, २ चमचे गुलाबपाणी, १ चमचा कोरफड जेल, अर्धा चमचा व्हेजिटेबल ग्लिसरीन, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल
Orange Peel Powder Face Serum
sakal
सर्वप्रथम संत्री स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. सालींमधील पांढरा भाग शक्य तितका काढून टाका. या साली उन्हात पूर्णपणे वाळवा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून चाळून घ्या.
Orange Peel Powder Face Serum
sakal
संत्र्याच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून ४ ते ६ तास ठेवा. नंतर मलमलच्या कापडातून गाळून अर्क काढा.
Orange Peel Powder Face Serum
sakal
संत्र्याच्या अर्कात कोरफड जेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळून एकजीव करा. तुमचे घरगुती सीरम तयार आहे!
Orange Peel Powder Face Serum
sakal
सीरम गडद काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. चेहऱ्यावर काही थेंब लावून मसाज करा आणि मॉइश्चरायझर लावा. सकाळी वापरताना सनस्क्रीन लावा.
Orange Peel Powder Face Serum
sakal
प्रिझर्व्हेटिव्ह नसल्याने सीरम फ्रिजमध्ये ठेवा. रंग किंवा वास बदलल्यास फेकून द्या. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि जळजळ झाल्यास वापर थांबवा.
Amla VS Bhringarj VS Methi for Hair Growth
sakal