Aarti Badade
फराळ (Chakli, Shankarpali, Ladoo) तयार करण्याची लगबगही वाढते. जास्त वेळ आणि मेहनत न लागता, पदार्थ बिघडणार नाही यासाठी काही स्मार्ट टिप्स वापरा!
Diwali Faral Hacks
Sakal
फराळ अगदी कमी वेळेत आणि परफेक्ट बनवण्यासाठी टाईम सेव्हिंग युक्त्या वापरणे गरजेचे आहे. वेळेचं नियोजन करण्यापासून ते साहित्य मोजून ठेवण्यापर्यंतची तयारी मदत करते.
Diwali Faral Hacks
Sakal
पदार्थांची यादी: कोणते पदार्थ बनवायचे याची यादी करून पूर्वतयारी लगेच सुरू करा. गोडाचे आणि तिखटाचे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी करा. यामुळे घाई-गडबड होत नाही.
Diwali Faral Hacks
Sakal
फराळाला सुरूवात करण्यापूर्वी लागणारे बेसन, रवा, तूप, तेल आणि मसाले व्यवस्थित मोजून-मापून ठेवा. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ थांबते आणि वेळ वाचतो.
Diwali Faral Hacks
Sakal
चकलीची भाजणी, शंकरपाळ्यांचे किंवा शेवचं पीठ आधीच तयार करून हवाबंद डब्यात ठेवा. आयत्यावेळी पीठ मळण्याचा कामाचा ताण यामुळे लगेच कमी होतो.
Diwali Faral Hacks
Sakal
मोठी कढई - तळण्यासाठी जास्त घेर असलेली मोठी कढई वापरा. एकाच वेळी जास्त पदार्थ तळता येतात.
Diwali Faral Hacks
Sakal
कुटुंबातील सदस्यांमध्ये कामे वाटा—एकाने पीठ मळावे, दुसऱ्याने चकली पाडावी, तिसऱ्याने तळण्याचे काम करावे.
Diwali Faral Hacks
Sakal
एकाच वेळी दोन कामे शेव तळताना करंजीचं सारण बनवा. यामुळे वेळेची बचत होते.
Diwali Faral Hacks
Sakal
तळलेले पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा, जेणेकरून त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.
Diwali Faral Hacks
Sakal
Crispy Chakli Recipe
Sakal