नो टॅक्स, गोल्डन पासपोर्ट मिळतो विकत; ललित मोदींनी नागरिकत्व घेतलेला देश कसा आहे?

सूरज यादव

वानुआतूचं नागरिकत्व

भारतात आर्थिक घोटाळ्या प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांनी भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केलाय. त्यांनी वानुआतू नावाच्या देशाचं नागरिकत्व विकत घेतलंय.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

पाँडिचेरीपेक्षा लहान

वानुआतू देश हा लोकसंख्येनं पाँडिचेरीपेक्षाही लहान आहे. या देशाचा गोल्डन पासपोर्ट ललित मोदींनी १.३ कोटी रुपयांना विकत घेतलाय.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

ललित मोदींचं प्रत्यार्पण कठीण

आतापर्यंत ललित मोदी लंडनमध्ये राहत होते. वानुआतूचं नागरिकत्व घेतल्यानंतर आता त्यांचं प्रत्यार्पण आणखी कठीण बनलं आहे.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

वानुआतूचं नैसर्गिक सौंदर्य

प्रशांत महासागरातील एका द्विपसमुहाचा भाग असलेला वानुआतू देश नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आहे. या देशाचा गोल्डन पासपोर्ट प्रसिद्ध आहे.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

पासपोर्ट मिळतो विकत

गोल्डन पासपोर्ट म्हणजे इथं गुंतवणूक करून कोणीही पासपोर्ट विकत घेऊ शकतो. यासाठी १.३ कोटी रुपये द्यावे लागतात.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

८३ लहान बेटांचा देश

वानुआतू हा ज्वालामुखींपासून बनलेल्या ८३ लहान लहान बेटांनी तयार झालेला देश आहे. लोकसंख्येनुसार हा देश १८२ व्या स्थानी आहे.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

इंग्लिश अन् फ्रेंच भाषा

वानुआतू देशावर ब्रिटन आणि फ्रान्सचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजी आणि फ्रेंच भाषा जास्त बोलली जाते.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

सक्रीय ज्वालामुखी

वानुआतूमध्ये अनेक सक्रीय ज्वालामुखी आहेत. १४५० मध्ये सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन एक बेट नष्ट झालं होतं.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

१९८० मध्ये झाला स्वतंत्र

हजारो वर्षांपूर्वी फिलिपाइन्सच्या लापिता जातीचे लोक इथं राहत होते. बराच काळ युरोपीय मिशनरींच्या ताब्यात हा देश होता. १९८० मध्ये वानुआतू स्वतंत्र झाला.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

कसलाच कर नाही

वानुआतू देशात आयकर, मालमत्ता कर, कार्पोरेट टॅक्स असा कोणताही कर आकारला जात नाही.

vanuatu where lalit modi took citizenship | Esakal

डोळ्याच्या सर्व समस्या होतील गायब, खायला सुरू करा 'या' दोन भाज्या

eye health food | esakal
इथं क्लिक करा