Monika Shinde
अनेकांना रोज प्रश्न पडतो की, आज भाजी काय करावी? जर तुम्ही असाच विचार करत असाल, तर हे खास झटपट सोलापुरी रेसिपी पहा
हरभरा डाळ, तूर डाळ हे २ मिनिट पाण्यात भिजवा
¾ वाटी हरभरा डाळ, ½ वाटी तूर डाळ, ¼ वाटी भाजलेले कारळ्याचे कूट किंवा शेंगदाण्याचे कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ
२ चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद आणि लसूण पाकळ्या टाकून चांगले परतवा
हरभरा डाळ व तूर डाळ फक्त किंचित शिजवाव्यात व नंतर पातेल्यात काढा.
त्यात भाजलेले कारळ्याचे कूट किंवा शेंगदाण्याचे कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ आणि ठेचलेली लसूण घालून सर्व मिश्रण नीट मिक्स करा.
हे मिश्रण मंद गॅसवर हलवत शिजवा अन गरज असल्यास थोडे गरम पाणी घाला.
तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद आणि लसूण फोडणी द्या.
खमंग फोडणी तयार झाल्यावर ती गरमागरम पेंडपाल्यावर ओता. थोडावेळ झाकून ठेवा.
पेंडपाला भाजी ज्वारीच्या भाकरी आणि शेंगाची चटणीसोबत वाढा. हिवाळ्यातील हा खास सोलापूरी बेत नक्कीच आवडेल