सूरज यादव
2025 नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया माचाडो यांना मिळाला होता. आता माचाडो यांनी त्यांचा हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून दिलाय.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
मारिया माचाडो यांनी व्हेनेझुएलात निकोलस मादुरो यांची सत्ता उलथवून टाकल्याबद्दल ट्रम्प यांचं आभार मानलं. त्यासाठीच त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्प यांना दिला.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
माचाडो यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांकडून हे सन्मानाचं प्रतीक असल्याचं म्हटलंय. ट्रम्प यांनीही हा माझ्यासाठी मोठा गौरव असल्याचं म्हणत मेडल स्वीकारलं.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
मारिया माचाडो यांचं कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की, मारिया अद्भुत असून त्यांनी खूप काही सहन केलंय. आपल्या कामाचा आदर म्हणून मला त्यांनी त्यांचं नोबेल पदक दिलं.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
माचाडो यांनी ट्रम्पना पुरस्कार भेट दिल्यानंतर नोबेल समितीने यावर अधिकृत निवेदन जारी केलं आहे. नोबेल पुरस्काराचा सन्मान दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही असं स्पष्ट केलंय.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
व्हाइट हाउसमध्ये माचाडो यांनी त्यांचं नोबेल पदक ट्रम्प यांना भेट दिलं. यावर नोबेल समितीने म्हटलं की, मेडल, पुरस्काराची रक्कम कुणालाही देता येईल पण अधिकृत विजेता म्हणून माचाडो यांचंच नाव राहील.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
नोबेल पुरस्कार मात्र एकाचा दुसऱ्याला देता येत नाही किंवा तो इतराच्या नावावर हस्तांतरित करता येत नाही असंही नोबेल समितीने स्पष्ट सांगितलं आहे.
Nobel Peace Prize Gift To Trump
Esakal
BMC Mayor Salary
ESakal