शेवाळापासून थेट नोबेलपर्यंत! मेंदूला नियंत्रित करणाऱ्या २०२६ च्या भन्नाट शोधाची गाथा

विनयन वाघमारे

तलावातलं हिरवं शेवाळ

क्लॅमिडोमोनास (Chlamydomonas) नावाचे एकपेशीय शेवाळ नेहमी प्रकाशाकडेच पाहत प्रवास करते. त्याला प्रकाश कसा कळतो, या कुतूहलातून या संशोधनाची सुरुवात झाली.

Moss

|

Sakal

शेवाळावरचं छोटं दार

जर्मनीच्या दोन शास्त्रज्ञांनी शोधले की, या शेवाळावर 'चॅनेलरोडॉप्सिन' नावाचे दार असते. त्यावर प्रकाश पडताच ते उघडते आणि आत वीज (विद्युत संकेत) सुरू होते.

Moss

|

Sakal

मेंदूचा हवेशीर 'रिमोट'

अमेरिकेच्या कार्ल डेसरोथ यांनी विचार केला की, हे दार मेंदूच्या पेशींना लावले तर? आणि हो, निळा प्रकाश टाकताच पेशी चालू अन् बंद होऊ लागली!

Moss

|

Sakal

ऑप्टोजेनेटिक्स तंत्रज्ञान

मेंदूतील लाईटचे बटन म्हणजेच 'ऑप्टोजेनेटिक्स'! या तंत्रामुळे मेंदूतील कोणती पेशी काय काम करते, हे आता अगदी स्पष्टपणे पाहणे शक्य झाले आहे

Moss

|

Sakal

आजारांवर उपचाराची दिशा

या क्रांतिकारी संशोधनामुळे पार्किन्सन, नैराश्य यांसारख्या गंभीर आजारांवर आणि मानवी अंधत्वावर मात करण्यासाठी संशोधनाला मोठी गती मिळाली आहे.

Moss

|

Sakal

तीन महान वैज्ञानिक

२०२६ चा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जर्मनीचे पीटर हेगेमन, जॉर्ज नागेल आणि अमेरिकेचे कार्ल डेसरोथ यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे.

Moss

|

Sakal

हवेत रिबीनसारखा नाचणारा हा अनोखा पक्षी पाहिलात का?

Indian Paradise Flycatcher)

|

Sakal

Click Here!