सकाळ डिजिटल टीम
घरातील अस्वच्छ हवा, स्वयंपाकाचा धूर आणि अपुऱ्या व्हेंटिलेशनमुळे फुफ्फुसे दुबळी होतात. त्यामुळे फक्त व्यसनच नाही, तर घरातील निष्काळजीपणाही फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो.
Indoor Air Pollution
sakal
अगरबत्तीच्या धुरातून PM2.5, कार्बन मोनॉक्साइड आणि बेंझिनसारखे सूक्ष्म कण बाहेर पडतात, जे थेट फुफ्फुसांच्या आत जाऊन सूज आणतात.
Incense sticks and scented candles
sakal
मच्छर कॉइल जळताना निर्माण होणारा धूर श्वासमार्गासाठी अत्यंत हानिकारक असतो. यामुळे अस्थमा, अॅलर्जी आणि सतत खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
Mosquito coil smoke
sakal
व्हेपिंग हा सिगारेटला सुरक्षित पर्याय नाही. यातील रसायनांमुळे श्वसनलिकांचे नुकसान होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वेगाने घटते.
Vaping and e-cigarettes
sakal
सतत बसून राहिल्याने आणि नियमित व्यायामाशिवाय फुफ्फुसांची ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते.
Lack of exercise and movement
sakal
घरात वापरले जाणारे रूम फ्रेशनर्स, मॉस्किटो स्प्रे आणि क्लिनिंग प्रॉडक्ट्समधील रसायने श्वासावाटे शरीरात जाऊन फुफ्फुसांना हानी पोहोचवतात.
Aerosols and chemical sprays
sakal
सलूनमधील हेअर स्प्रे, बेकरीमधील पीठाची धूळ, बांधकामावरील सिमेंट आणि ट्रॅफिकमधील डिझेलचा धूर यांमुळे श्वसनविकार जडतात.
Workplace pollution
sakal
स्वतः धूम्रपान न करताही इतरांनी सोडलेल्या सिगारेटच्या धुरात राहिल्याने फुफ्फुसांचे तितकेच गंभीर नुकसान होते.
Passive smoking
sakal
पेंट, वेल्डिंगचा धूर, डिसइन्फेक्टंट्स आणि औद्योगिक सॉल्व्हेंट्सच्या सततच्या संपर्कामुळे क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचा (Chronic Bronchitis) धोका वाढतो.
Exposure to chemicals and solvents
sakal
जास्त धूळ, धूर किंवा प्रदूषित हवेत फिरताना फेस मास्क न वापरल्याने सूक्ष्म प्रदूषक थेट फुफ्फुसांच्या खोल भागापर्यंत पोहोचतात.
The habit of not wearing a mask
sakal
रोज जेवणात चिमूटभर हिंग वापरल्याने कोणते फायदे होतात ?
Asafoetida Benefits
sakal