kimaya narayan
बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. सोशल मीडियावर ही जोडी कायम चर्चेत असते.
बॉलिवूडचं हे लाडकं सेलिब्रिटी कपल खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे फोटोजही गाजतात.
ब्रम्हास्त्र हा या जोडीचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा गाजला आणि या सिनेमादरम्यानच ही जोडी रिलेशनशिपमध्ये आली. पण तुम्हाला माहितीये का ? हा सिनेमा या जोडीचा पहिला सिनेमा नसता.
आलिया लहान असताना तिला आणि रणबीरला पहिल्या सिनेमाची ऑफर आली होती. त्या दोघांना बालिका वधू या सिनेमाची ऑफर आली होती. त्यावेळी रणबीर 20 तर आलिया नऊ -दहा वर्षाची होती.
या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार होते. पण नंतर हा सिनेमा काही कारणामुळे बारगळला.
ब्रम्हास्त्र सिनेमादरम्यान हे दोघं रिलेशनशिपमध्ये आले. ते दोघं लिव्ह इन मध्ये राहत होते.
2022 मध्ये आलिया आणि रणबीरने लग्न केलं. त्यांना राहा नावाची मुलगी आहे.