Payal Naik
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं आयुष्य कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिलं.
त्यातील एक अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. बिग बींचं वैयक्तिक आयुष्यही कायम प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलं.
अमिताभ- रेखा- जया या लव्ह ट्रँगलबद्दल आजही चर्चा होताना दिसते. पण अशी एक अभिनेत्री होती जी अमिताभ यांच्यासाठी रात्रभर रडत बसायची.
मध्यरात्री उठून ती अमिताभ यांच्या नावाने ओरडायची. त्यांच्यासाठी रडायची.
तिच्यामुळेच महेश भट्ट यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून अमिताभ यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.
ही अभिनेत्री होती परवीन बाबी. ही गोष्ट आहे 'दोस्ताना' चित्रपटादरम्यानची.
आयएमडीबीच्या अहवालानुसार, या चित्राच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री बंगळुरूमध्ये उपचार घेत होती. तिला 'स्किझोफ्रेनिया' नावाचा मानसिक आजार होता.
जेव्हा परवीन या चित्रपटाचं शूटिंग करत होती तेव्हा तिला अनेकदा झटके यायचे. ती मध्यरात्री उठायची आणि अमिताभ बच्चनसाठी मोठ्याने रडू लागायची.
त्यामुळे महेश भट्ट यांनी अमिताभ यांना भेटून परवीनसोबत चांगलं वागण्याची विनंती केली होती.
ती खूप त्रासातून जात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा अमिताभ यांनी तिची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं मात्र माध्यमांमध्ये आपणच महेश भट्ट यांना परवीनची काळजी घेण्यास सांगितल्याचं म्हटलं.
परवीनचा मृत्यू २०जानेवारी २००५ मध्ये झाला होता. तिचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत सापडला होता.
बहुतेक मंदिरं ही उंच डोंगरांवरच का बांधलेली असतात? उत्तर वाचून तुम्हीही चकीत व्हाल