Anushka Tapshalkar
शरीरातील हार्मोन्स केवळ अंतर्गत अवयवांवरच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यावरही मोठा प्रभाव टाकतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड हार्मोन्ससाठी डोळ्यांतील विविध ग्रंथींमध्ये स्वतंत्र रिसेप्टर्स असतात.
इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन मेबोमियन ग्रंथी व अश्रुग्रंथींच्या कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मेनोपॉजनंतर हार्मोन्स कमी झाल्याने महिलांमध्ये ड्राय आयचा धोका वाढतो.
मासिक पाळीच्या फॉलिक्युलर टप्प्यात इस्ट्रोजेनची पातळी वाढते. यामुळे अश्रू निर्मितीवर दाहक परिणाम होऊन डोळे कोरडे पडण्याची समस्या वाढू शकते.
गर्भधारणा, मासिक पाळी किंवा हार्मोनल गोळ्या घेतल्यामुळे कॉर्नियाची जाडी व वक्रता बदलू शकते. याचा परिणाम दृष्टीतील बदल आणि डोळ्यांच्या दाबावर होऊ शकतो.
इस्ट्रोजेनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे डोळ्याच्या लेन्सचे संरक्षण करतात. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन कमी झाल्याने महिलांमध्ये मोतीबिंदूचा धोका वाढतो.
इस्ट्रोजेन रेटिनातील गँग्लियन पेशींचे संरक्षण करते आणि डोळ्यांचा दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन कमी झाल्यास काचबिंदूचा धोका वाढू शकतो.
इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि अँड्रोजेन्स यांचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्युलर डीजेनेरेशनपासून काही प्रमाणात संरक्षण देतात.
थायरॉईड हार्मोन्स असंतुलित झाल्यास डोळे बाहेर येणे, दुहेरी दिसणे, स्नायू जाड होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे ARMD चा धोका देखील वाढतो.
sakal