पुजा बोनकिले
सर्वांच्या घरी पिवळी हळद असते.
हळदीमध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात.
सर्दी, खोकला झाल्यास हळदी दूध घेतल्यास आराम मिळतो.
पण तुम्हाला माहितीय का बाजारात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या देखील हळदी उपलब्ध आहेत.
काळ्या रंगाची हळद आरोग्यासाठी फायदेशीर असते.
काळी हळद ही कॅन्सरवर गुणकारी आहे.
या काळ्या हळदीपासून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषधे तयार केले जातात.