केरळ नव्हे, 'या' राज्याने नारळ उत्पादनात घेतली मोठी झेप!

Aarti Badade

'नारळाची भूमी' बदलली!

'केरळ' हे राज्य नारळाची भूमी आहे. मात्र, आता नारळाच्या एकूण उत्पादनात शेजारील 'कर्नाटक' राज्याने मोठी झेप घेत केरळला मागे टाकले आहे.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

सर्वाधिक उत्पादनाचे राज्य

'इन्व्हेस्ट कर्नाटक'च्या आकडेवारीनुसार, कर्नाटक हे सध्या भारतातील सर्वात जास्त नारळ पिकवणारे राज्य बनले आहे. या राज्याचे वार्षिक उत्पादन तब्बल ६०० कोटींहून (६ बिलियन) अधिक नारळांवर पोहोचले आहे.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

देशाच्या उत्पादनात २८.५% वाटा नारळ उत्पादनाच्या बाबतीत कर्नाटकाने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. भारताच्या एकूण नारळ उत्पादनात एकट्या कर्नाटक राज्याचा वाटा सुमारे २८.५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

नारळ शेतीसाठी अनुकूल हवामान

कर्नाटकातील किनारपट्टीवरील शहरे जसे की, मंगळुरू आणि उडुपी, तसेच तुमकुरु, हासन आणि मांड्या या जिल्ह्यांमध्ये नारळाच्या शेतीसाठी उत्तम उष्ण आणि दमट हवामान उपलब्ध आहे.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

तामिळनाडूचे 'नारळाचे शहर'

राज्यांच्या यादीत कर्नाटक अव्वल असले, तरी शहरांचा विचार केला तर तामिळनाडू राज्यातील 'पोल्लाची' या शहराला भारताची 'नारळाचे शहर' म्हणून ओळखले जाते.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

पोल्लाचीमधून परदेशात मोठी निर्यात

तामिळनाडूच्या पोल्लाची शहरामध्ये सलग वर्षभर अतिशय उच्च दर्जाच्या नारळाचे उत्पादन होते. या एकाच शहरातून देशभरात आणि परदेशात देखील नारळाची खूप मोठी निर्यात केली जाते.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

नारळाची नवी ओळख

थोडक्यात सांगायचे तर, आता सर्वाधिक नारळ उत्पादनाचे राज्य म्हणून 'कर्नाटक' आणि सर्वाधिक उत्पादन घेणारे मुख्य शहर म्हणून 'पोल्लाची' ने देशात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

Karnataka Big Leap Coconut Production

|

Sakal

'केळी अन् तूप' एकत्र 'या' वेळी खा! मिळतील अनेक फायदे

ghee and banana eating time

|

Sakal

येथे क्लिक करा