कामात मन लागत नाही? काय सांगतो Vroom सिद्धांत

Pranali Kodre

कामात मन लागत नाही?

अनेकदा असं होतं की आपण काम करतो, पण आपलं मन लागत नाही. याबाबतीत मानसोपशास्त्रज्ञ व्हिक्टर व्ह्रूम यांनी एक सिद्धांत मांडला होता.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

व्हिक्टर व्ह्रूम यांचा सिद्धांत

व्हिक्टर व्ह्रूम यांच्या सिद्धांतानुसार 'माणूस किती मेहनत करेल, हे त्याला शेवटी काय मिळणार आहे आणि ते त्याला हवे आहे की नाही,यावर ठरते.'

Victor Vroom

|

Sakal

कामाची प्रेरणा

व्ह्रूमच्या मते कामाची प्रेरणा (Motivation) तीन गोष्टींवर अवलंबून असते - अपेक्षा (Expectancy), साधन/विश्वास (Instrumentality) आणि बदल्याचे मूल्य (Valence).

Lack Of Motivation At Work

|

Sakal

अपेक्षा (Expectancy)

आपण केलेल्या मेहनतीमुळे आपली कामगिरी (performance) सुधारेल, हा विश्वास म्हणजे अपेक्षा. उदा. चांगला अभ्यास केला, तर चांगले गुण मिळतील.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

साधनता/विश्वास (Instrumentality)

चांगले काम केले, तर योग्य reward मिळेल, असा विश्वास म्हणजे Instrumentality. उदा. चांगले काम केले, तर प्रमोशन मिळेल.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

बदल्याचे मूल्य (Valence)

Reward किती महत्त्वाचा आहे, याची व्यक्तीला असलेली किंमत म्हणजे Valence.उदा. एखाद्यासाठी प्रमोशन महत्त्वाचं असू शकतं, तर दुसऱ्यासाठी सॅलरी.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

... तर कामाची प्रेरणा कमी

त्यामुळे या तीन घटकांपैकी एकही घटक शून्य असेल, तर कामासाठी लागणारी प्रेरणाही कमी किंवा शून्य असू शकते.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

सिद्धांताचा मुख्य आधार म्हणजे तीन प्रश्न

  • मी प्रयत्न केले तर मला यश मिळेल का?

  • मी काम पूर्ण केलं, तर मला दिलेले वचन पाळले जाईल का?

  • मिळणारा बदला माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचा आहे का?

Lack Of Motivation At Work

|

Sakal

ऑफिस किंवा जॉबमध्ये याचा फायदा कसा?

आधी स्वत:चे कौशल्य सुधारा, कामाचे योग्य फळ मिळण्यासाठी बॉसशी स्पष्ट बोला, तुम्हाला काय हवंय ते नेमकं ओळखा.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

सारांश

जेव्हा व्यक्तीला मेहनतीचा परिणाम आणि त्या परिणामातून मिळणाऱ्या rewardची किंमत स्पष्ट दिसते, तेव्हा काम करण्याची प्रेरणाही वाढते.

Lack Of Motivation At Work

|

Sakal

विणकाम केवळ छंद नाही, तर टेन्शन आणि डिप्रेशनवरील वरदान

Mental Health Benefits of Crochet

|

Sakal

येथे क्लिक करा