फक्त छावाच नाही तर हे ऐतिहासिक सिनेमेही अडकलेले रिलीजपूर्वी वादाच्या कचाट्यात

kimaya narayan

छावा

अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित सिनेमा छावा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. छावा प्रमाणेच या आधीही अनेक बॉलिवूडमधील ऐतिहासिक सिनेमे वादग्रस्त ठरले आहेत. जाणून घेऊया या सिनेमांविषयी.

Bollywood Movies

पद्मावत

दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत हा सिनेमा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. राजस्थानमधील अनेक राजपूत संघटनांनी राणी पद्मावतीचा अवमान केल्याप्रकरणी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Bollywood Movies

जोधा अकबर

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबरही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. जोधाबाई ही अकबराची पत्नी नव्हती असं राजपूत संघटनांनी म्हटलं होतं आणि सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Bollywood Movies

सम्राट पृथ्वीराज

अक्षय कुमारचा पृथ्वीराज सिंह चौहान हा सिनेमा चुकीचा इतिहास, शीर्षक बदल, राजपूत परिवाराचे चुकीचे चित्रण यामुळे वादात अडकला होता.

Bollywood Movies

पानिपत

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत सिनेमाही चुकीच्या कथेमुळे वादग्रस्त ठरला. जाट समाजाचे चुकीचे चित्रण केल्यामुळेही या सिनेमाला विरोध झाला होता.

Bollywood Movies
Krushna Abhishek
कपडे ठेवण्यासाठी घेतला फ्लॅट - येथे क्लिक करा