kimaya narayan
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा एक जुना बोल्ड सीन पुन्हा चर्चेत आला आहे. पण तुम्हाला माहितीये फक्त तेजश्रीचं नाही तर मालिकाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड सीन शूट केले आहेत.
राधा ही बावरी या मालिकेमुळे श्रुती घराघरात पोहोचली. पण श्रुतीने या आधी आणि नंतरही काही बोल्ड सीन दिले आहेत.
श्रुतीने अनेक साऊथ इंडियन सिनेमात बोल्ड सीन दिले आहेत इतकंच नाही सत्य, सावित्री आणि सत्यवान सिनेमातील तिचे बोल्ड सीन वादग्रस्त ठरले होते.
तर तप्तपदी सिनेमातही तिने आणि कश्यप परुळेकरने केलेल्या बोल्ड सीनची चर्चा खूप झाली होती. काहींनी तर टीकाही केली होती.
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड सीन्ससाठीही प्रसिद्ध झाली आहे. या गोजिरवाण्या घरात सईने एका साध्या मुलीची भूमिका साकारली होती.
हंटर, क्राईम बीट यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सईने बोल्ड सीन्स दिले आहेत. क्राईम बीटमध्ये तर तिने लेस्बियन किस सीन शूट केला होता तर दुनियादारी सिनेमातील तिचा आणि स्वप्नीलचा लीप लॉक सीनही गाजला होता.
तेजस्विनी पंडित
अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही सुरुवातीच्या काळात मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या साध्या सुनेच्या भूमिका खूप गाजल्या होत्या.
पण तेजस्विनीच्या बोल्ड सीन्सने एकच खळबळ उडाली. समांतरमध्ये तिने आणि स्वप्नीलने दिलेला इंटिमेट सीन असो किंवा रानबाजार सिनेमातील सीन असो अनुराधा या सिरीजमध्ये तेजस्विनीने बोल्ड सीन केले आहेत.
छोट्या बायोची मोठी स्वप्न यांसारख्या मालिकांमध्ये काम करणारी वीणा जामकरने बोल्ड भूमिका केल्या आहेत.
मित्रा या सिनेमात तिने लेस्बियन महिलेची भूमिका साकारली तर लालबाग परळ सिनेमातही तिने बोल्ड सीन दिले होते.
मराठी टेलिव्हिजनवरील गोड अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या प्राजक्ता माळीनेही बोल्ड सीन केले आहेत.
रानबाजार वेबसीरिजच्या प्रोमोमध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीनने अनेकांना धक्का बसला होता. बऱ्याच जणांनी तिच्यावर टीका केली होती.