Payal Naik
'होणार सून मी या घरची' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
ती 'अग्गबाई सुनबाई' आणि 'प्रेमाची गोष्ट' मध्येही झळकली.
मात्र तिने स्टार प्रवाहावरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अचानक एक्झिट घेतली.
त्यामुळे चाहते दुखावले गेले. निरनिराळ्या चर्चाही झाल्या. मात्र चर्चेत येण्याची तेजश्रीची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वी ती तिच्या एका किसिंग सीनमुळे चर्चेत आली होती.
तेजश्रीने 'बबलू बॅचलर' या बॉलिवूड चित्रपटात काम केलं होतं.
त्यात तिने अभिनेता शरमन जोशीसोबत किसिंग सीन दिला होता.
तिच्या या सीनची प्रचंड चर्चा झाली होती. काहींनी तर तिला ट्रोलही केलं होतं.
सध्या तेजश्री ब्रेकवर असून तिने कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.