सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी घौडदौड सुरू आहे. पण अशात कॉंग्रेस प्रवक्त्यांकडून एक वादग्रस्त मुद्दा छेडला गेला आहे.
भारताने काल न्यूझीलंडविरूद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम साखळी सामना जिंकला व अपराजीत राहून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मागील ३ आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताने अवघा एक सामना गमावला आहे.
पण काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी सोशल मीडियावर भारतीय कर्णधार रोहित शर्माला टॅग करूत त्याच्या फिटनेवरून टीका केली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये 'रोहित जाडा आहे' म्हटले आणि तो भारताचा सर्वात अपयशी कर्णधार आहे म्हणत त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
तर, भाजप प्रवक्त्यांनी कॉंग्रेसकडून द्वेष पसरवला जात असल्याचा दावा केला गेला आहे.
पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय संघात रोहित शर्मा नाही तर मोहम्मद शमीचे सर्वात जास्त वजन आहे.
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्माचे वजन ७२ किलो आहे
स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे वजन ६९ किलो आहे.
विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतचे वजन ६५ किलो आहे.
वेगवान गोलंदाज हर्षित राणाचे वजन ७२ किलो इतके आहे.
तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वजन ९० किलो आहे.