Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत २ मार्चला भारत आणि न्यूझीलंड संघात साखळी फेरीतील अखेरचा सामना झाला.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला हा सामना विराट कोहलीसाठी वैयक्तिकदृष्टीने खास ठरला आहे.
त्याचा हा कारकिर्दीतील ३०० वा वनडे सामना आहे.तो ३०० वनडे खेळणारा जगातील २२ वा, तर भारताचा सातवा खेळाडू ठरला.
यापूर्वी ३०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर एक नजर टाकू.
सचिन तेंडुलकरने ४६३ वनडे सामने खेळले असून १८४२६ धावा केल्या आहेत.
एमएस धोनीने ३५० वनडे सामने खेळले असून १०७७३ धावा केल्या आहेत.
राहुल द्रविडने ३४४ वनडे सामने खेळले असून १०८८९ धावा केल्या आहेत.
मोहम्मद अझरुद्दीनने ३३४ वनडे सामने खेळले असून ९३७८ धावा केल्या आहेत.
सौरव गांगुलीने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत.
युवराज सिंगने ३०४ वनडे सामने खेळले असून ८७०१ धावा केल्या आहेत.