Mansi Khambe
सध्या वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. यामुळे अनेकांना डाएट करावे लागते. त्यामुळे मसालेदार, चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाताना अनेकदा विचार करावा लागतो.
मात्र आता अशाच सोप्या आणि चविष्ट पदार्थ खाऊन तुम्ही कसलाही विचार न करता खाऊ शकणार आहात. ज्यामुळे तुमचा आहार निरोगी आणि मनोरंजक होईल.
मिक्स व्हेजिटेबल सूपमुळे पोट भरते आणि पचनास मदत होते. यामध्ये तुम्ही गाजर, बीन्स, कोबी आणि मटार यांसारख्या भाज्या उकळून काळी मिरी आणि लिंबू घालून चव वाढवू शकता.
पनीर हलके ग्रील करा आणि त्यात काकडी, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोबी मिसळा. वर थोडे ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू घाला.
मुगाची डाळ आणि तांदूळ यापासून बनवलेली खिचडी पोटाला हलकी असते आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्यात थोडे तूप आणि हळद घालून चव कायम ठेवा.
ओट्स बनवण्यासाठी ते हलके भाजून घ्या आणि त्यात कांदा, गाजर, बीन्स, मोहरी आणि कढीपत्ता घाला. हे एक चविष्ट आणि पौष्टिक डिनर आहे, जे वजन देखील नियंत्रणात ठेवते.
हे उच्च-प्रथिने आणि कमी-कॅलरी अन्नधान्य आहे. त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून पुलाव बनवा. हलक्या मसाल्यांनी बनवलेला हा पुलाव वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
अनेकांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. मात्र तुम्ही टोमॅटो घालून तुपात साधी दुधीची भाजी शिजवून खाणं देखील आरोग्याला चांगलंच फायदेशीर आहे.