सकाळ डिजिटल टीम
भारत सरकारची 'एनपीएस वात्सल्य योजना' तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.
Vatsalya Yojana
Sakal
ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात घोषित केली व सप्टेंबर 2024 पासून लागू झाली आहे.
NPS Vatsalya Inaguration
Sakal
या योजनेचा उद्देश 0-18 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण, करिअर आणि आर्थिक सुरक्षा निश्चित करणे आहे.
NPS Vatsalya
Sakal
यात आई, वडील किंवा कायदेशीर पालक हे आपला मुलगा किंवा मुलगीच्या नावावर यात खाते उघडू शकतात आणि यात नियमित पैसे टाकून भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकतात.
NPS Vatsalya account
Sakal
या योजनेत किमान वार्षिक गुंतवणुकीची अट ही 1,000 रुपयांची आहे. म्हणजेच प्रति महिना किमान 83 रुपयांची गुंतवणूक होय. तर कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
Money
Sakal
या गुंतवणुकीतील पैशांवरील व्याज आणि चक्रवाढ व्याज बँक खात्यावर वेळोवेळी जमा होत असते. तसेच यातील गुंतवणुकीवर 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते.
NPS Vatsalya
Sakal
विशेष गोष्ट म्हणजे या खात्याचा लॉक इन कालावधी हा मुलाच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. यातील गुंतवणूक इक्विटि बाजारात केली जाते.
NPS Vatsalya scheme
sakal
मुलाच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खात टियर-1 एनपीएस खात्यात रूपांतरीत होते म्हणजे मुल स्वतः खात्याचे व्यवस्थापन करू शकते.
NPS Vatsalya acc
Sakal
ही योजना भारत सरकारच्या नॅशनल पेन्शन सिस्टमचा भाग असून पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे संचलित आहे. त्यामुळे गुंतवणुकीची सुरक्षितता आहे.
NPS
Sakal
Home Loan
ESakal