Pranali Kodre
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ९ असतो.
अंकशास्त्रानुसार ९ मूलांक असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कसे असते, हे थोडक्यात जाणून घेऊ.
अंकशास्त्रातील मूलांक ९ चा कारक ग्रह मंगळ आहे. मंगळाच्या प्रभावामुळे या व्यक्तींमध्ये लढाऊ वृत्ती, धाडस आणि नेतृत्वगुण असतात. ते न्यायासाठी लढणारे असतात.
९ मूलांक असलेल्या व्यक्ती प्रेमळ, भावनाशील आणि सहृदयी असतात.
अशा व्यक्तींचे मन सर्जनशील असते. त्यांच्यात कल्पकता असते आणि नवनिर्मितीची आवड असते.
या व्यक्ती शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाच्या असतात.
९ मूलांक असलेल्या व्यक्ती प्रामाणिक, पारदर्शक आणि कुटुंबवत्सल देखील असतात. त्यांना समाजात आपलं स्थान लवकर निर्माण करता येतं.
या लोकांमध्ये भरपूर उत्साह, सखोल विचारशक्ती आणि अचूक निरीक्षण क्षमता असते.
मूलांक ९ असलेल्या व्यक्तींसाठी इलेक्ट्रॉनिक्स, अग्नीशी संबंधित काम, वैद्यकीय क्षेत्र (विशेषतः सर्जरी) आणि संरक्षण सेवा हे करियर फायदेशीर ठरू शकते.
अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं. असे लोक खेळाडू, सर्जनशील लेखक किंवा मोठ्या पदांवर पोहोचणारे नेते देखील होऊ शकतात.
दरम्यान, या व्यक्तींचा स्वभाव आक्रमकही असतो आणि अनेकदा ते घाईत निर्णय घेतात, जे त्यांना अडचणीत आणू शकते.
तसेच या लोकांमध्ये अहंकार, स्वार्थीपणा आणि सूड प्रवृत्तीही आढळून येते. त्यामुळे ते इतरांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत.
या व्यक्तींना अनेक गोष्टी एकाच वेळी करायच्या असतात. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांची मानसिक ऊर्जा वाया जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.