Anushka Tapshalkar
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या पोषणमुल्यांची आवश्यकता असते. परंतु, त्यांच्या कमतरतेमुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. खालील काही लक्षणे तुमच्यातील विशिष्ट पोषणमुल्यांच्या कमतरतेची शक्यता दर्शवतात:
सतत थकल्यासारखे वाटणे किंवा शरीरातील ताकद कमी होणे ही व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेची लक्षणे आहेत.
त्वचा सारखी कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे हे वारंवार होत असेल तर ते व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन A ची कमतरता दर्शवतात.
तुम्हाला जर बऱ्याच काळापासून केस गळतीची समस्या त्रास देत असेल किंवा तुमच्या केस अकाली पांढरे होत असतील तर तुम्हाला बायॉटिन, लोह आणि व्हिटॅमिन B12 युक्त आहाराची गरज आहे.
उठताना, बसताना किंवा चालताना अचानक तुमच्या हाताचा कोपरा किंवा पायाचा गुडघा सारखा मोडत असेल किंवा तुमचे सांधे सतत दुखत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन D व कॅल्शिअमची कमी असण्याची शक्यता आहे.
तुम्हाला जर सतत तोंड येण्याची समस्या उद्भव असेल तर ते तुमच्यातील व्हिटॅमिन B आणि झिंकची कमतरता दर्शवते.
विनाकारण किंवा कोणतीही जखम झाली नसताना देखील जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुमच्यात व्हिटॅमिन C आणि K ची कमतरता असण्याची शक्यता आहे.
नखे कमजोर होणे किंवा नखांवर पांढरे डाग असणे झिंक ची कमतरता दर्शवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.