पौष्टिक अन् खमंग शेवग्याच्या पानांची चटणी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल!

Aarti Badade

शेवग्याच्या पानांचे फायदे

शेवग्याची पाने व्हिटॅमिन A, C, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. त्यामुळे ही चटणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

आवश्यक साहित्य

१ ते २ कप शेवग्याची पाने,२ चमचे चणा डाळ,१ चमचा उडीद डाळ,२ ते ४ चमचे किसलेले खोबरे,३ ते ५ लसूण पाकळ्या, २ ते ३ लाल किंवा हिरव्या मिरच्या,चिंच, मीठ आणि १ चमचा तेल

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

डाळ आणि मसाला भाजा

कढईत तेल गरम करून चणा डाळ आणि उडीद डाळ सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर लसूण आणि मिरच्या घालून हलके परतून घ्या.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

शेवग्याची पाने परता

भाजलेल्या मिश्रणात शेवग्याची पाने आणि किसलेले खोबरे घालून काही मिनिटे परता. पाने मऊ झाल्यावर गॅस बंद करा.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

वाटून तयार करा

मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिंच आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर मिक्सरमध्ये अगदी कमी पाणी घालून जाडसर किंवा बारीक वाटून घ्या.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

सर्व्ह करण्याची पद्धत

तयार चटणी गरम भात, तूप, पोळी, भाकरी किंवा डोशासोबत सर्व्ह करा. ही चटणी जेवणाची चव अनेकपटींनी वाढवते.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

आरोग्य टिप

ही चटणी पौष्टिक असली तरी ती ताजी बनवून खाणे अधिक योग्य. संतुलित आहारासोबत तिचा आस्वाद घेतल्यास अधिक फायदा मिळतो.

Shevga Drumstick Leaves Chutney Recipe

|

Sakal

दलिया म्हणजे काय? कसा तयार होतो?

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

येथे क्लिक करा