Aarti Badade
फिटनेस जगतात ओट्स लोकप्रिय असले तरी, प्रत्येकासाठी ते फायदेशीर नाहीत. काही लोकांसाठी ओट्स आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात.
ओट्स ग्लूटेन-फ्री असले तरी, ते ग्लूटेनयुक्त पदार्थांच्या कारखान्यात तयार होतात. ज्यांना सिलीअॅक डिसीज किंवा संवेदनशील आतड्यांची समस्या आहे, त्यांनी टाळावेत.
काही लोकांना ओट्स खाल्ल्यानंतर ऍलर्जिक प्रतिक्रिया होतात.उलटी, जुलाब, त्वचेवर पुरळ यासारखे त्रास होऊ शकतात.
ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात. हे रक्तातील साखर वाढवू शकतात – मधुमेही व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानेच सेवन करावे.
ओट्समध्ये फायटिक अॅसिड असते, जे शरीराला लोह आणि झिंक शोषू देत नाही. त्यामुळे लोहाची कमतरता असलेल्या लोकांनी ओट्स टाळावेत.
जास्त फायबरमुळे काही लोकांना गॅस, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.अशा लोकांनी ओट्स खाणं मर्यादित किंवा बंद ठेवावं.
लोहाच्या शोषणावर परिणाम झाल्यास, शरीर अधिक थकलेले, अशक्त होऊ शकते. अशा लोकांनी दुसरे पर्यायी नाश्त्याचे पर्याय निवडावेत.
ओट्स आरोग्यदायी असले तरी काही विशेष परिस्थितीत त्याचं सेवन हानिकारक ठरू शकतं.
आपल्या शरीरानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानेच ओट्सचा आहार ठरवा.