Puja Bonkile
आजच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढत आहे. ज्याचा वाईट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
अनेक लोकांना तर ऑफिस वेळ संपल्यानंतर देखील काम सुरुच असते. यामुळे नैराश्य वाढते. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करतात आणि त्यातून त्यांची सुटका होत नाही. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या मिळून तणाव खूप वाढवतात.
या तणावापासून सूटका हवी असेल तर पुढील टिप्स फॉलो करु शकता.
ऑफिस आणि घरातील कामाचा ताण कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा. दररोज असे केल्याने ताण कमी होतो.
मानसिक आणि शारीरिक आजार दूर ठेवण्यासाठी पुरेशी झोपण घेणे गरजेचे आहे.
सतत एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर थोडा वेळ ब्रेक घ्यावा. सतत काम केल्याने तण वाढतो.
ताण कमी करण्यासाठी फास्टफूड खाणे टाळावे. पौष्टिक आणि ताज्या पदार्थांचे सेवन करावे.